नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट हाेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:08+5:302021-01-18T04:31:08+5:30
मेहकर : नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट होता. मात्र, हा लढा संपल्यानंतर समाज विखुरला गेला, याची खंत व्यक्त करून ...
मेहकर : नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट होता. मात्र, हा लढा संपल्यानंतर समाज विखुरला गेला, याची खंत व्यक्त करून या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणल्याशिवाय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होणार नाही, अशी भावना भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी व्यक्त केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत नामविस्तार स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अनंतराव वानखेडे प्रमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम ऊमाळकर, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाम ऊमाळकर यांनी आपल्या भाषणात भाई कैलास सुखधाने व ॲड. अनंतराव वानखेडे यांनी नामांतर आंदोलनातील सक्रिय सहभागाची, लढ्याची आठवण करून देत महापुरूषांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नारायण पचेरवाल, किशोर गवई, ॲड. सी. वाय. जाधव, युनूस पटेल, संजय वानखेडे, प्रकाश पवार, रियाज कुरेशी, अशितोष तेलंग, छोटू गवळी, सुरज मिरे, मुनाफ भाई, रामभाऊ सुरुशे, नारायण इंगळे, आकाश अवसरमोल, सचिन वाठोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नामांतर शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संचालन संजय वानखेडे यांनी केले. युनूस पटेल यांनी आभार मानले.