अभाविप चिखली शहर कार्यकारिणी घोषित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:56+5:302021-07-31T04:34:56+5:30

चिखली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली नगराचे २८ जुलै रोजी छात्रनेता संमेलन पार पडले. यामध्ये अभाविपची २०२१-२२ या ...

Abhavip Chikhali city executive announced! | अभाविप चिखली शहर कार्यकारिणी घोषित !

अभाविप चिखली शहर कार्यकारिणी घोषित !

googlenewsNext

चिखली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली नगराचे २८ जुलै रोजी छात्रनेता संमेलन पार पडले. यामध्ये अभाविपची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी चिखली नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. निर्वाचन अधिकारी म्हणून प्रा. प्रशांत देशमुख व जिल्हा प्रमुख प्रा. सुनील काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चिखली शहरच्या नूतन कार्यकारिणीमध्ये नगराध्यक्ष म्हणून प्रा. शरद इंगळे, तर नगरमंत्री म्हणून मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहमंत्री राहुल नागपुरे, तेजस भवर, भाग्यश्री सोळंकी, महाविद्यालय प्रमुख शुभम राजपूत, महाविद्यालय सहप्रमुख आदित्य उन्हाळे, कार्यालयमंत्री यश पांडे, कार्यालय सहमंत्री अनिकेत सुरुशे, विद्यार्थिनी प्रमुख अमृता गुप्ता, विद्यार्थिनी सहप्रमुख कोमल दांदळे, प्रसिद्धी प्रमुख सुयश केसकर, सह प्रसिद्धी प्रमुख ओम जाधव, सोशल मीडिया प्रमुख दर्शन ठाकूर, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख विशाल हिवरकर, विकासार्थ विद्यार्थी सहप्रमुख ऋतिक डुकरे, सेवार्थ विद्यार्थी प्रमुख आयुष पारिख, सेवार्थ विद्यार्थी सहप्रमुख गणेश इंगळे, फार्माव्हिजन प्रमुख गौरव थिगळे, फार्माव्हिजन सहप्रमुख लक्ष्मी ढोकने, तर सदस्यपदी आशुतोष पालवे, गणेश जोशी, यश जाधव, वैभव ढोले, ऋषिकेश हिंगमिरे, विनायक शिंदे, श्यामल उरसाल, चैतन्य जोशी, स्वप्नील कुळकर्णी, कपिल झगडे, प्रा. हेमंत जाधव, प्रा. सुनील काकडे, प्रा. प्रशांत देशमुख, प्रणव पवार, अमोल पवार यांची निवड करण्यात आली आहे.

पूर्व नगरमंत्री स्वप्नील कुळकर्णी यांनी मंत्री प्रतिवेदन सादर केले. आभार कपिल झगडे यांनी मानले. यावेळी जिल्हा संघटनमंत्री प्रणव पवार, अमोल पवार व अभाविपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Abhavip Chikhali city executive announced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.