फरार आरोपीस वन विभागाकडून अटक
By admin | Published: July 14, 2017 12:43 AM2017-07-14T00:43:10+5:302017-07-14T00:43:10+5:30
एक दिवसाची वन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
जामोद : वन विभागाच्या पथकाने २१ जून रोजी जामोद येथील शे.राजीक शे.सरदार यांच्या सुतार कामठ्यावर धाड टाकून ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यातील फरार आरोपी शे.राजीक शे. सरदार यास १२ जुलै रोजी पकडण्यात आले.
उपवनसंरक्षक बुलडाणा बी.जी. भगत, सहायक वनसंरक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद वन परिक्षेत्राधिकारी एन.एस. कांबळे, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी मेहत्रे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी. खान, जी.एस. उंबरहंडे यांनी गुरीक्र.६१७/१९ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ, ४१, ४२, ५२, ६१ अ, ६५ अ नुसार राहत्या घरातून अटक केली व आरोपीस न्यायदंडाधिकारी जळगाव जामोद न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीस १३ जुलैपर्यंत एक दिवसाची फॉरेस्ट कस्टडी मिळाली आहे.
पुढील तपास एस.जी. खान, सहायक वन परिक्षेत्राधिकारी जामोद वर्तुळ हे करीत आहेत. आरोपीस अटक करण्याकरिता वनसंरक्षक बांगरे, वनसंरक्षक गवळी, वनमजूर पांडु धांडेकर, शालीग्राम मिसाळ यांनी मोलाची कामगिरी बजावली.