फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:44 AM2017-05-16T00:44:20+5:302017-05-16T00:44:20+5:30

जळगाव जामोद : फरार आरोपी आसीफ खान, फिरोज खान (वय २६) रा.ताजनगर जळगाव यास अखेर जळगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली.

The absconding accused finally got caught in the police trap | फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Next

जळगाव जामोद : बुलडाणा येथील कारागृहात दाखल करणे कामी नेत असताना १३ फेब्रुवारी रोजी नांदुरा येथील बसस्टॉपवर पोलिसांच्या हाताला झटका देवून हतकडीसह फरार आरोपी आसीफ खान, फिरोज खान (वय २६) रा.ताजनगर जळगाव यास अखेर जळगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली.
सदर आरोपी हा चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीच्या सवयीचा असून त्याचेवर जळगाव, नांदुरा, भुसावळ इत्यादी ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर जळगाव पोलीस स्टेशनला नोव्हेंबर २०१६ मध्ये कलम ४५७, ३८० अन्वये त्याचेवर गुन्हा नोंद होता व १३ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस त्याला बुलडाणा येथे नेत असताना तो नांदुरा येथून पसार झाला होता. त्यावेळी कलम २२४ अन्वये नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे जळगाव जामोदचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी, पोहेकाँ विश्वनाथ जाधव, पोकाँ गणेश पाटील, उमेश भारसाकळे यांनी शोध घेवून सदर आरोपीस मुक्ताईनगर येथून पकडले व १४ मे रोजी जळगाव न्यायालयात दाखल केले.

Web Title: The absconding accused finally got caught in the police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.