चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी LCBच्या गळाला; फरार आरोपीला SP ऑफिसजवळ घेतले ताब्यात
By भगवान वानखेडे | Updated: March 14, 2023 19:16 IST2023-03-14T19:15:54+5:302023-03-14T19:16:23+5:30
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी LCBच्या गळाला; फरार आरोपीला SP ऑफिसजवळ घेतले ताब्यात
बुलढाणा : चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई १४ मार्च रोजी दुपारी करण्यात आली. २०२२ मध्ये चोरी केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात (शेख इस्माईल शेख इब्राहिम रा. पंचगव्हाण, ता. तेल्हारा, जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. या घटनेपासून आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता.
मात्र १४ मार्च रोजी आरोपी बुलढाणा तालुक्यातील धाड येथे आल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एलसीबीच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून आरोपी धाड येथून पंचगव्हांकडे परत जात असताना बुलढाणा एसपी कार्यालय जवळ त्याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीच्या सोबत असलेल्या महिला घाबरुन त्यांनी आरडाओरड केल्याने त्या ठिकाणी एकच धांदल उडाली होती.