बियाणे काठावर तर रासायनिक खते मुबलक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:27+5:302021-06-09T04:42:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात ...

Abundant chemical fertilizers on the edge of seeds! | बियाणे काठावर तर रासायनिक खते मुबलक !

बियाणे काठावर तर रासायनिक खते मुबलक !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खतांची उपलब्ध आहे. मात्र, बियाणे नेमकी जितकी गरज आहे तितकेच उपलब्ध असल्याने दुबार अथवा तिबार पेरणीचे संकट ओढावल्यास मात्र, ऐनवेळी बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरावर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणावणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार हेक्टर ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर ११ हजार ५०० हेक्टरावर तूर, ३ हजार ८०० हेक्टरावर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी लागणारे बियाणे सद्य:स्थिती पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, ऐनवेळी पावसाने दगा दिल्यास अथवा बियाण्यांमध्ये उगवण क्षमता कमी आल्यास दुपार अथवा तिबार पेरणीची वेळ आल्यास ऐनवेळी मात्र, बियाण्यांची टंचाई उद्भवण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने यंदा खतांची टंचाई भासणार नाही.

२ हजार १९५ मे.टन खते लागणार

तालुक्यातील चिखली, अमडापूर, मेरा आणि शेलसूर या मंडळातील एकूण १३० गावांतील शेतकऱ्यांना सुमारे २ हजार १९५ मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने कृषी विभागाने मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, सुरुवातीला खतांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली होती. मात्र, आता वाढीव दरात केंद्राने कपात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२९१.९० मे.टन बियाण्यांची आवश्यकता !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरचेच बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. यासाठी सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. सोयाबीनसह इतर बियाणे असे एकूण २९१.९० मे.टन बियाणे यंदा पेरणीसाठी लागणार आहे.

बांधावर खते व बियाणे वाटप !

कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता कृषी विभागाने खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी कृषी विभागाने गुगल फॉर्म लिंक व व्हाॅटस्‌अ‍ॅपचा आधार घेतला असून याद्वारे शेतकऱ्यांनी बियाणे व खताची मागणी नोंदविल्यानंतर त्या गावातील शेतकऱ्यांचा एकत्रित गटाचे नियोजन करून गटप्रमुख व कृषी केंद्रधारकांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर अथवा द्वारपोच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील वाचणार आहे.

Web Title: Abundant chemical fertilizers on the edge of seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.