पद्मावती धरणात उन्हाळ्यातही मुबलक जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:15+5:302021-03-16T04:34:15+5:30
धामणगाव धाड : येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात उन्हाळ्यातही मुबलक जलसाठा असल्याने परिसरातील ३२ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ...
धामणगाव धाड : येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात उन्हाळ्यातही मुबलक जलसाठा असल्याने परिसरातील ३२ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच रब्बी पिकांसह उन्हाळी पिकांनाही धरणाचे पाणी उपलब्ध हाेणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धामणगाव धाड येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात मोठ्या प्रमाणात सध्या जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरातील वालसावंगीसह पारध, वाढोणा, धामणगाव, मासरूळ, डोमरूळ टाकळी, आदी ३२ गावांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, तसेच पशुपालक व पाळीव प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तहान भागवत आहे. पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फायदा झाला आहे. तसेच पद्मावती शिवारातील शेतकरी यांनी रब्बी हंगामातील लागवड केलेल्या मका, कोंथिबीर, मेथी, सूर्यफुलांसह विविध रब्बी हंगामातील पिकांना धरणातील पाण्याचा लाभ हाेत आहे. परिसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, परिसरातील डोंगराळ भागात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. जंगल शुकशुकाट झाले आहे. तसेच काही भागातील मेंढपाळ पाळीव प्राण्यांसह जंगलातील वन्यप्राणी पद्मावती धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्याकडे आपली तहान भागविण्यासाठी परिसरात येत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांचा पाणीप्रश्न हा धरणाच्या पाण्यातून सुटणार आहे. गेल्या मागील तीन वर्षांपूर्वी भोकरदन तालुक्यात मोठी पाणीटंचाई निर्माण झाली होती व महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत हाेती. पशुपालकांना चारा व पाणीटंचाईमुळे रानावनात भटकंती करावी लागत हाेती. परिसरातील पाणवठे कोरडेठाक पडले होते; परंतु यावर्षी पद्मावती धरणात ५० ते ६० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणाची खोली पाण्यापासून ५० फूट खोल आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठा असतो. धरणाची लांबी धरणाच्या भिंतीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. धरणात मुबलक पाणी असल्याने परिसरातील गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.