अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:31 AM2020-04-24T11:31:04+5:302020-04-24T11:31:18+5:30
सोनाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा सोनाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
अल्पवयीन मुलगी शेतात मजूरीसाठी गेली होती. त्याठिकाणी शेतामध्ये दंगलसिंग सूरसिंग कलच्छा याने मुलीवर अत्याचार केला. मुलीने आरडाओरड केल्याने शिवारातील शेतकरी धावून आले. शेतकऱ्यांनी त्यास चांगलाच चोप दिला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनला प्राप्त होताच ठाणेदार अमर चोरे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी पोहचले. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी दंगलसिंग सूरसिंग कलच्छा (रा. शिवाजी नगर) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह सहकारी पोलिस कर्मचारी करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)