ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:16+5:302021-07-22T04:22:16+5:30

पीडित मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस सध्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहे. यासंदर्भात ...

Abuse of a minor girl by blackmail | ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

पीडित मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस सध्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहे.

यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली आहे. त्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय मुलाने १५ वर्षीय मुलीशी मधल्या काळात जवळीक साधली होती. सोबतच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी आपण आपल्याच जिवाचे बरेवाईट करून घेईल असे म्हणत. मुलीला त्याने ब्लॅकमेल करत जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्रस्त झालेल्या मुलीने याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील यांनी दिली.

Web Title: Abuse of a minor girl by blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.