पक्षात पद देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; शेगावात राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Published: February 18, 2024 06:28 PM2024-02-18T18:28:10+5:302024-02-18T18:28:25+5:30

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका गावातील ३८ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Abuse of women with the lure of a party post A case has been registered against a person in the political sector in Shegaon | पक्षात पद देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; शेगावात राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

पक्षात पद देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; शेगावात राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

खामगाव (बुलढाणा): शेगावातील राजकीय पक्षाच्या व्यक्तीने विवाहितेशी सोशल मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर पक्षात मोठे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावले. त्यावेळी गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी शेगाव शहरात उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका गावातील ३८ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

शेगाव शहरातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेला आशिष सत्यनारायण व्यास (वय ३७, रा. स्वामी विवेकानंद चौक) याची सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका गावातील ३८ वर्षीय विवाहित महिलेशी मैत्री झाली. यावेळी आशिष व्यास याने तो राजकीय पक्षात मोठ्या पदावर असल्याचे महिलेला भासविले. तसेच महिलेला मोठ्या पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवून मैत्री केली. त्यानंतर महिलेला आईची प्रकृती बरी नसल्याचे सांगून १ फेब्रुवारी रोजी घरी बोलाविले. स्वामी विवेकानंद चौकातील घरी नेऊन सरबत पाजले. 

त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून विवाहितेला बेशुद्ध केले. तसेच तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आक्षेपार्ह छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने विवाहितेला वेळोवेळी शेगाव येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराला कंटाळून शेवटी महिलेने शेगाव शहर ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशिष सत्यनारायण व्यास याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२), ३२८,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शेगाव शहर पोलिस करीत आहेत.

Web Title: Abuse of women with the lure of a party post A case has been registered against a person in the political sector in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.