पीक कर्जाची प्रक्रिया गतिमान करा- सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:20+5:302021-05-14T04:34:20+5:30
सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या वर्षी जिल्ह्याचा निर्धारित लक्ष्यांक २,४६० कोटी रुपये होता. ...
सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या वर्षी जिल्ह्याचा निर्धारित लक्ष्यांक २,४६० कोटी रुपये होता. तो यंदा मोठ्या प्रमाणावर कमी करून १३०० कोटींवर आणला गेला आहे. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी सुद्धा यंत्रणेने केवळ १२६० कोटीचे पीककर्ज वाटप केल्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात हंगामाकरिता गतवर्षीच्या तुलनेत निम्मे १३०० कोटी रुपयांचा अत्यंत कमी लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. त्यातही केवळ १०३ कोटी म्हणजे फक्त ८ टक्केच पीक कर्ज प्रत्यक्षात वाटप झाले आहे. मुळातच लक्ष्यांक कमी करणे हे अनाकलनीय व संतापजनक आहे. सोबतच खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे चालू खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचा लक्ष्यांक गतवर्षीपेक्षा दीड पटीने वाढविण्यात यावा. तो ३,६०० कोटी रुपये करण्यात यावा तथा पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तात्काळ नियोजन केेले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.