जिल्ह्यातील विकास आराखड्यांच्या कामांना गती द्या- अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:33+5:302021-02-17T04:41:33+5:30
दरम्यान लोणार विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामेही प्राधान्याने कालमर्यादेत पुर्ण करण्यास त्यांनी सांगितले. २०५ कोटी रुपयांचा लोणार विकास आराखडा ...
दरम्यान लोणार विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामेही प्राधान्याने कालमर्यादेत पुर्ण करण्यास त्यांनी सांगितले. २०५ कोटी रुपयांचा लोणार विकास आराखडा असून पहिल्या टप्प्याततील १०७ कोटी रुपयांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने सरोवरातील वेळी बाभूळ निर्मलनासोबतच पहिल्या टप्प्यातील शहरातील भुमीगत जलवाहिनी, सरोवराला लागून असलेल्या खासगी जमीनीचे भुसंपादन याकरीता आवशय्क प्रस्ताव मार्गी लावणे, सरोवराच्या भोवती सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामे, पदपथ, शासकीय इमारतीची दुरुस्ती यासह अन्य कामांना गती द्यावे. आगामी वर्षभरात या कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोणार दौऱ्यादरम्यान दिले होते. सरोवर संवर्धनाच्या दृष्टीने कामाला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
शेगाव संस्थांच्या सहकार्याने कामे मार्गी लावा
सुमारे ३०० कोटी रुपयांच्या शेगाव विकास आराखड्यातील अंतिम टप्प्यातील काही कामे राहलेली आहेत. ती शेगाव संस्थांच्या सहकार्याने मार्गी लावावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थांचा एक नाव लौकिक आहे. त्याच्या माध्यमातून शेगाव विकास आराखड्यातील उर्वरित राहलेली कामे दर्जेदार व चांगल्या पद्धतीने होतील, असे ते शेवटी म्हणाले.