लाच स्वीकारताना अव्वल कारकुनास अटक
By Admin | Published: July 14, 2014 10:52 PM2014-07-14T22:52:38+5:302014-07-14T22:52:38+5:30
खामगाव : उपविभागीय कार्यालयातील घटना
जळगाव जामोद : दोनशे रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून भीमराव गणाजी तायडे (वय ५६) यांना आज १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
जळगाव जामोद येथील इमाम नजाकतअली खान हाकमअली खान, वय ७0 रा.वायली वेस यांना त्यांचे शेतीचे प्रकरणाच्या आदेशाच्या नक्कला तहसिल कार्यालयास पाठविण्याकरिता उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून भीमराव गणाजी तायडे यांच्याकडून २00 रुपये लाचेची मागणी होत होती. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरुन आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यवाही आयोजीत केली असता अव्वल कारकून भिमराव गणाजी तायडे यास उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे तक्रारदार नजाकतअली खान हाकमअली खान यांचेकडून २00 रुपयांची लाचेची रक्कम २00 रुपये स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाचेची रक्कम २00 रुपये हस्तगत करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक तडवी, पोलिस उपअधिक्षक एस.एल.मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय भोंगे, पोहेकॉ शेकोकार, नेवरे, पोना.गडाख, ढोकणे, चोपडे, शेळके, ठाकरे, जवंजाळ, पोकॉ सोळंके, वारुळे, राजनकर, यादव यांनी केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा येथे संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.