Accident: अनियंत्रित ट्रक सिलिंडरच्या ट्रकला धडक देऊन उलटला! दोघे जखमी

By अनिल गवई | Published: January 2, 2023 08:56 PM2023-01-02T20:56:40+5:302023-01-02T21:16:47+5:30

Accident: भरधाव ट्रकने सुरूवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलींडरच्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला.

Accident: An uncontrolled truck hit the cylinder's truck and overturned! Both injured | Accident: अनियंत्रित ट्रक सिलिंडरच्या ट्रकला धडक देऊन उलटला! दोघे जखमी

Accident: अनियंत्रित ट्रक सिलिंडरच्या ट्रकला धडक देऊन उलटला! दोघे जखमी

googlenewsNext

- अनिल गवई
खामगाव - भरधाव ट्रकने सुरूवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलींडरच्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान घडली. यात ट्रकचालकासह एक जण जखमी झाला आहे.

खामगाव येथून एमएच ४० एके ४४४७ क्रमांकाचा ट्रक नांदुराकडे राख घेऊन जात होता. दरम्यान, जलंब नाक्यासमोर या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरूवातीला सुटाळा येथील राजू जानकीराम बगाडे या सायकल स्वारास धडक दिली. त्यानंतर खामगाव ते सुटाळा पर्यंतच्या रस्तादुभाजकावरील विद्युत खांबांना धडक दिली. त्यानंतर एमएच ३७ टी ०२७१ या सिंलीडर घेऊन जाणाºया ट्रकच्या एका बाजूला धडक देत, रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. तात्काळ खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविले. ज्ञानेश्वर मुकींदा अंमलकार (४२ रा. काळेगाव ता. खामगाव) असे जखमी चालकाचे नाव असून वाहक अवधेशप्रताप(३४ रा. उत्तरप्रदेश) हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याचवेळी जखमी सायकल स्वाराला एका खासगी रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

सिलींडरच्या ट्रकला सुरक्षीत स्थळी हलविले
भरधाव ट्रकने धडक दिल्याने सिलींडरच्या ट्रक मधील काही सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. दरम्यान, शहर पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न लावता सिलींडरच्या ट्रकला सुरक्षीत ठिकाणी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचा दावाही सुत्रांकडून करण्यात आला. या घटनेमुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Web Title: Accident: An uncontrolled truck hit the cylinder's truck and overturned! Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.