मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 16:40 IST2019-11-29T16:40:08+5:302019-11-29T16:40:14+5:30
दुचाकीस्वार दत्तात्रय डोईजड गंभीर जखमी झाले आहेत.

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर
कारेगाव: मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कारेगाव फाट्यानजीक घडली. लोणार तालुक्यातील खळेगाव येथील दत्तात्रय मुरलीधर डोईजड हे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरून सुलतानपुरकडे जात होते. याचवेळी सुलतानपूरकडून येणाºया मालवाहू वाहनाने (एम.एच.२८ एबी ३३२५) त्यांच्या दुचाकीला (एम.एच.२८ ८२३३) धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहन व दुचाकी बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळली. यामध्ये दुचाकीस्वार दत्तात्रय डोईजड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भात पोलिस स्टेशमध्ये नोंद करण्यात आली नव्हती.