देऊळगाव राजा-चिखली रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला  खाजगी बसची धडक; ४६ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:20 PM2018-07-25T12:20:41+5:302018-07-25T18:37:32+5:30

देऊळगाव मही (बुलडाणा) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भक्तांच्या मॅटेडोअरला खाजगी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मॅटेडोअरमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी ४.४५ वाजता घडली.

Accident on Deulgaon Raja-Chikhali road; 35 injured | देऊळगाव राजा-चिखली रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला  खाजगी बसची धडक; ४६ जखमी 

देऊळगाव राजा-चिखली रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला  खाजगी बसची धडक; ४६ जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देजखमींना उपचारार्थ बुलडाणा, जालना येथे हलविण्यात आले असून, घटनास्थळावरून खाजगी बस चालक फरार झाला आहे.एमएच ३० एचडी २२०० या क्रमांकाच्या खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मॅटेडोअरला जोरदार धडक दिली.या अपघाता मॅटेडोअरमधील जवळपास ३५ प्रवासी जखमी झाले असून मॅटेडोअरचा चुरा झालेला आहे.

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथून परतणाºया जळगाव खान्देश जिल्ह्यातील तथा मध्य प्रदेशातील भाविकांच्या टेम्पोला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीनजीक पहाटे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसने जबर धडक दिल्याने ४६ प्रवासी जखमी झाले. हा अपघात २५ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास घडला. जखमींपैकी २६ जणांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर गंभीर सहा जणांना जालना येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकास देऊळगावराजा पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये टेम्पो चालक पांडुरंग शांताराम पाटील, (रा. खामखेड, जि. जळगाव) याच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नीती प्रभाकर पाटील (रा. खामखेड), वसंत हिराजी पाटील (पाथर्डी, बºहाणपूर, मध्य प्रदेश), मोहन राजाराम पाटील (खकणार, बºहाणपूर), अमरदीप आनंदा पाटील (मुक्ताईनगर), गोविंदा नारायण महाजन (नायनखेडा, बºहाणपूर), माधुरी महाजन (खकणार), लता महाजन (नायनखेडा), अंजना पाटील (रुईखेड), प्रमिला धनगर (वरणगाव), सुनंदा बोरसे (पातोंडी, रावेर), भारती पाटील (बेलसावडी, मुक्ताईनगर), बेबीबाई बोरसे (चिखली, ता. मलकापूर), शांताबाई पाटील (मुक्ताईनगर), बेबीबाई पाटील (पिंप्री), सुनीता महाजन (शहापूर, बºहाणपूर), सुमित्रा पाटील (भोकरी), सुनीता चौधरी (शहापूर), जिजाबाई ठाकूर (शहापूर), कोकिळा चौधरी (खकणार), सुशीला पाटील (खकणार), दगडाबाई पाटील (खकणार), विमल बाबुराव माळी (खकणार), यशोदा पाटील, शेवंताबाई पाटील (चिंचखेड), लाडकीबाई सावलकर (सावरगाव), ज्योती जाधव (खकणार) यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अन्य जखमींमध्ये पंडित भोरसे, सुनंदा पंडित, शोभा बावीस्कर, वच्छला पंडित, शिवाजी ताठे, रंजना पाटील, आरती अनिल पाटील, वैशाली कोडे, आशा भांबरे, भारती पाटील, गोविंदा सकाळे, पिराबाई, नीलेश, सुभाष सुधीर, रुख्माबाई, कामिनी काडेळकर यांचा समावेश आहे. यापैकी काहींवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
पंढरपूरवरून टेम्पोद्वारे परतणारे जळगाव खान्देश व मध्य प्रदेशमधील भाविक हे देऊळगाव महीनजीक बुधवारी पहाटे ४.४५च्या सुमारास स्वामी विवेकानंद विद्यालयानजीक रस्त्याच्याकडेला टेम्पोमध्येच थांबले होते. त्यात ५० ते ५२ प्रवासी होते. दरम्यान, देऊळगावराजाकडून चिखलीकडे जात असलेल्या भरधाव वेगातील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसने (एमएच ४०-एचडी-२२००) बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या टेम्पोला जबर धडक दिली. त्यामध्ये हा टेम्पो अक्षरश: तुटून रस्त्याच्या बाजूला उलटला, त्यामुळे त्यात बसलेले प्रवासी दबल्या गेले.

Web Title: Accident on Deulgaon Raja-Chikhali road; 35 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.