घाटपूरी बायपासवर अपघात; वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:58 PM2018-12-11T12:58:59+5:302018-12-11T12:59:09+5:30

खामगाव : शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

Accident on Ghatpuri Bypass; Traffic Police Neglect | घाटपूरी बायपासवर अपघात; वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

घाटपूरी बायपासवर अपघात; वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

Next

 राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाºयावर!            
खामगाव : शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घाटपूरी मार्गावर मिनीडोअर व ट्रकचा अपघात घडल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले घटनास्थळी बघ्यांनी केलेल्या गर्दीमुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर तासभर तरी या परिसरात वाहतूक पोलीस दिसून आले नाही.
घाटपुरी कडून खामगावकडे मिनिडोअर क्रमांक एम.एच.२८-१७८२ ने शेतमाल विक्रीसाठी नेण्यात येत होता. दरम्यान घाटपुरी ते खामगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर गौरक्षण परिसरात या मिनीडोअरला ट्रक क्रमांक आर.जे.३१ जी.ए.०१११ ने मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मिनीडोअरचे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. यावेळी ट्रकचालकाकडून मिनिडोअरचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वाद निर्माण झाला होता. अशी परिस्थीती असताना, घटना घडल्यानंतर तब्बल तासभर या ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले नाही. विशेष म्हणजे अपघात स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीसांचा पॉर्इंट असल्यावरसुध्दा एकही पोलीस घटनास्थळावर दिसून आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाºयावर असल्याचे दिसून आहे.


प्रवाशी वाहनांमधून शेतमालाची वाहतूक!
ग्रामीण भागातून अनेक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून शेतमालाची वाहतूक करण्यात येते. वास्तविक पाहता, अशा वाहनांमधून माल वाहतूक करण्यास प्रतिबंध असताना, दररोज शेकडो वाहनांमधून अशी मालवाहतूक होताना दिसते. याकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष होते. परिणामी क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या वाहनचांलकांचेही नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. याकडे आरटीओकडून सुध्दा कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून येते.

Web Title: Accident on Ghatpuri Bypass; Traffic Police Neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.