मजुरांना घेवून जाणाऱ्या मिनी ट्रकचा अपघात; एक ठार, १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 08:03 PM2021-02-28T20:03:55+5:302021-02-28T20:04:08+5:30
Accident News अपघातामध्ये १५ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
बुलडाणा: चिखली येथून अैारंगाबादकडे मजुरांना घेवून जाणाऱ्या एका मिनी ट्रकला देऊळगाव राजाकडून येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये १५ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. हा ्पघात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंढेरा फाट्यानजीक घडला.दररम्यान अपघातातील जखमींना प्रथम देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून तीन जणांना जालना तर सात जणांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
एमएच-२०-बी-५६२१ क्रमांकाचा मिनी ट्रक हा मजुरांच्या कुटुंबांना घेवून अैारंगाबादकडे जात होता. दरम्यान अंढेरा फाट्यानजीक एमपी-०९-एचएच-११५२ या क्रमांकाच्या ट्रकची मीनी ट्रकला जबर धडक लागली. त्यामध्ये अैारंगाबाद येथील अविनाश तुंबरे अवघडनाथ (रा. माळीवाडा) हा जागीच ठार झाला तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेते प्रथमोपचार करून तीन गंभीर जखमींना जालना येथे तर अन्य सात जणांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आलेल्यांमध्ये विना अवघडराव कुमरे, निहू अवघडराव कुमरे, गिता रामनाथ कुमरे, राखी अजय कुमरे, मैना रंगनाथ कुमरे, अजय जगन्नाथ कुमरे, रुपा रंगनाथ कुंमरे (सर्व रा. माळीवाडा, अैारंगाबाद) यांचा समावेश आहे.