राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:46 PM2020-02-09T12:46:05+5:302020-02-09T12:46:11+5:30
पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला.
बुलढाणा : शेगाव वरुन अमडापूर कडे परत येत असलेल्या पोलिसांच्या वाहनास अपघात झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात खामगाव चिखली मार्गावर मोहदरी येथील जय भोले मंदिरानजीक घडला. या अपघातातील दोन्ही जखमी पोलिसांना खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांना किरकोळ मार लागण्याचे अमडापुर पोलिसांनी सांगितले. पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील हे पोलीस वाहन होते. पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला. मोहदरी येथील एका वळणावर वाहन रस्त्याच्या कडेला गेल्याने ते उलटून हा अपघात झाल्याचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी सांगितले . अपघातामध्ये कुणी फारसे गंभीर नसल्याचे ते म्हणाले.