सर्क्युलर रोडवर अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:28 AM2021-07-25T04:28:51+5:302021-07-25T04:28:51+5:30
शाळा बंद असल्याने नादुरूस्त वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष बीबी: परिसरतील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांची ...
शाळा बंद असल्याने नादुरूस्त वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष
बीबी: परिसरतील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांची डागडुजी करण्यात येत नाही. सध्या शाळा बंद असल्याने याकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
उद्घाटनानंतरही पुलाचे बांधकाम रखडले
बुलडाणा : तालुक्यात काही ठिकाणी पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर अद्यापही पुलाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या ग्रामस्थांसाठी गरजेचा असलेला पूल प्रत्यक्षात कधी मार्गी लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिला बचत गट अडचणीत
मोताळा: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली. परंतु, आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंराेजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तूंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे.
ज्ञानगंगा प्रकल्पात वाढला जलसाठा
बुलडाणा: बुलडाणा ते खामगाव रस्त्यावर असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे. संततधार पावसाने जलस्त्रोतांना जलसंजीवनी मिळाली आहे. ज्ञानगंगा या प्रकल्पाचे विहंगम दृश्य येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
फवारणी पंपांसाठी राॅकेल मिळेना
किनगाव राजा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सोयाबीन आणि कपाशी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीला वेग दिला आहे. मात्र, फवारणी करणाऱ्या पंपांसाठी राॅकेल मिळत नसल्याचे चित्र सिंदखेड राजा तालुक्यात आहे.