Accident: एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात कापले, आणखी एक जण गंभीर, मलकापूर-पिंपळगाव देवी रस्त्यावरील घटना

By योगेश देऊळकार | Published: September 16, 2022 12:29 PM2022-09-16T12:29:36+5:302022-09-16T12:49:13+5:30

Accident: धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. मलकापूर-पिंपळगांव देवी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात दोघांचे हात कटले आहेत तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे

Accident: Two hands cut due to letter coming out of ST, another seriously, incident on Malkapur-Pimpalgaon Devi road | Accident: एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात कापले, आणखी एक जण गंभीर, मलकापूर-पिंपळगाव देवी रस्त्यावरील घटना

Accident: एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात कापले, आणखी एक जण गंभीर, मलकापूर-पिंपळगाव देवी रस्त्यावरील घटना

Next

- योगेश देऊळकार
मलकापूर : धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. मलकापूर-पिंपळगांव देवी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात दोघांचे हात कटले आहेत तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे. दोघांवर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून एकास अत्यवस्थ अवस्थेत जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले आहे.

मलकापूर आगारातून एसटी क्रमां एम.एच.४०/एन.९१२१ ही आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजता निघाली होती. सकाळी ६.२० वाटेच्या सुमारास धावत्या एसटीचा चालकाच्या पाठीमागील बाहेर आलेल्या पत्र्याने विरूद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकल स्वार गणेश शंकर पवार (वय ३६ रा. पिंपरी गवळी) यांच्या हाताला जबर खरचटले व एसटी पुढे धावली. धावत्या एसटीच्या बाहेर निघालेल्या पत्र्याच्या कचाट्यात पुढे पोलिस भरतीसाठी धावत असलेला विकास गजानन पांडे (वय २२ रा. उर्रा) हा आला. बाहेर आलेल्या पत्र्याने त्याचा हात कलम केला तर त्याच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या. त्याची तब्येत खालावल्याने त्याला मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

याच घटनेत धावत्या एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्याने परमेश्वर आनंदा सुरडकर (वय ४५ रा.आव्हा) यांचा देखील हात कलम झाला. त्याचबरोबर पोटावर गंभीर जखमा झाल्या. त्यांचे आतडे बाहेर आल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव खान्देशात हलविण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक द्वय सुखदेव भोरकडे व बालाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी एसटी स्थानकात दाखल होऊन परिस्थिती हाताळल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

संतप्त नागरिकांनी केली आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोड
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आगारप्रमुख दादाराव दराडे यांना आगारात बोलावून घेतले. काही क्षणातच संतप्त गावकऱ्यांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोड केली. आगारप्रमुखांवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कसाबसा हात निसटून आगारप्रमुखांनी पळ काढल्याने ते बाल बाल बचावले आहेत. या घटनेनंतर चालक देवराव भावराव सुर्यवंशी यांनी एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केली आहे. मलकापूर एसटीच्या स्थानकावर मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Accident: Two hands cut due to letter coming out of ST, another seriously, incident on Malkapur-Pimpalgaon Devi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.