राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाचा भीषण अपघात ; दोन्ही वाहने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:14 PM2019-04-10T15:14:08+5:302019-04-10T15:15:48+5:30
मलकापूर: नांदुरा तालुक्यातील धानोरा धानोरा फाटा नजीक बुधवारी भीषण अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली.
मलकापूर: नांदुरा तालुक्यातील धानोरा धानोरा फाटा नजीक बुधवारी भीषण अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली.
या घटनेने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मलकापूर वरून नांदुरा कडे दोन वाहने येत होती दरम्यान समोर जाणार्या वाहनाला मागील बाजूने धडक बसली. या अपघातात अचानक एका वाहनाने पेट घेतला. अपघाताची भीषणता एवढी होती की पाठीमागील वाहन सुद्धा ताबडतोब पेटायला लागले. या अपघाताने खामगाव ते मलकापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. दोन्ही वाहनातील वाहन चालक घटनास्थळी आढळून आले नाही त्यामुळे ते या आगीत तर जळालं असावेत असा संशय नागरिकांना आहे. वाहने अजूनही पेटत असल्याने वाहनचालकांचा शोध घेणे नागरिकांना कठीण झाले आहे.
तापमानात वाढ
सध्या बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात तापमान वाढले आहे. खामगाव शहराचे तापमान सध्या ते 43 डिग्री सेल्सिअस असून तापमानात वाढ झाल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.