ह्रदयद्रावक... खड्डा चुकवताना अपघात, ६ महिन्यांपूर्वीच लग्न झालेला युवक ठार

By संदीप वानखेडे | Published: August 28, 2022 10:05 PM2022-08-28T22:05:09+5:302022-08-28T22:08:31+5:30

वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्द येथील घटना

Accident while avoiding pothole, young man who got married 6 months ago died | ह्रदयद्रावक... खड्डा चुकवताना अपघात, ६ महिन्यांपूर्वीच लग्न झालेला युवक ठार

ह्रदयद्रावक... खड्डा चुकवताना अपघात, ६ महिन्यांपूर्वीच लग्न झालेला युवक ठार

googlenewsNext

डोणगाव (बुलडाणा) : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव कारच्या चालकाने दुचाकी चालकाला जबर धडक दिली. यामध्ये युवक जागीच ठार झाला. ही घटना २८ ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्द येथे घडली. माधव सुदाम नाईकवाडे रा. पिंप्री सरहद्द असे मृत युवकाचे नाव आहे.

डोणगावपासून तीन ते चार किमी अंतरावर असलेल्या पिंप्री सरहद्द परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे.  पिंपरी सरहद्द येथील माधव सुदाम नाईकवाडे हा युवक दुचाकीने गावाकडे जात होता. दरम्यान, कार क्र. एमएच ०४ जीयू ९१९१ ने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की माधव नाईकवाडे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, महामार्गाची गत काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

माधव नाईकवाडे या युवकाचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले हाेते. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असलेल्या माधवचा आज खड्ड्यांनी घात केला. कुटुंबातील तो कर्ता असल्याने नाईकवाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Accident while avoiding pothole, young man who got married 6 months ago died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.