सवडदच्या विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:10+5:302021-09-11T04:35:10+5:30
-- बीबी येथील सहकार विद्या मंदिरामध्ये वृक्षारोपण बीबी : बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी बुलडाणा अर्बन विभाग ...
--
बीबी येथील सहकार विद्या मंदिरामध्ये वृक्षारोपण
बीबी : बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी बुलडाणा अर्बन विभाग मेहकर व देऊळगाव राजा शाखेस भेट दिली. राधेश्याम चांडक यांनी मेहकर विभागामधील सर्व वेअर हाऊस व सहकार विद्यामंदिर या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ९ सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित सहकार विद्या मंदिर बीबी येथे बुलडाणा अर्बन विभाग मेहकरचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक प्रमोद दंडे, सहकार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक कैलास तरवडे, श्रीनिवास घुगे, माजी सरपंच छाया बगडिया, प्रदीप चव्हाण, रमेश खंडागळे, भिसन काळे, शेख फयूम, इम्रानभाई आदी उपस्थित होते.
--
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी
मोताळा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या अभियानांतर्गत ॲप डाऊनलोड करून या ॲपद्वारे मोबाइलच्या साहाय्याने ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे. तालुक्यातील शेतकरी हे पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी ‘माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीकपेरा’ या अभियानांतर्गत खरीप हंगामाची या वर्षातील सन २०२१-२२ करिता पीक पाहणी ही मोबाइल ॲपद्वारे ई-पीक पाहणी स्वरूपात शेतकऱ्यांना स्वत: करायची आहे.