रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं बेतलं जिवावर,अपघातात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:43 AM2018-12-17T10:43:53+5:302018-12-17T10:45:44+5:30
रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं दोन युवकांना महागात पडलं आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मलकापूर - रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं दोन युवकांना महागात पडलं आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल समाधान नेमाडे (वय २० वर्ष) आणि अमर निना शेळके (वय २०वर्ष) दोघंही नोकरीसाठी फिटनेस हवा यासाठी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बुलढाणा रस्त्यावर आले होते. निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाने राहुलला चिरडले. या अपघातात त्याच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अमर शेळकेच्या कमरेवर गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अमरला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान राहुलच्या मृत्युमुळे निंबारी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ज्या वाहनामुळे अपघात झाला त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.