दीड वर्षात ३९९ जणांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:48+5:302021-07-18T04:24:48+5:30
देऊळगाव राजात नियमांचे उल्लंघन देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात निर्बंध कडक करण्यात ...
देऊळगाव राजात नियमांचे उल्लंघन
देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सायंकाळी ४ नंतर सर्व दुकाने बंद करण्याचे तसेच संचारबंदी असतानाही देऊळगाव राजात अनेक दुकाने सुरूच राहत असल्याचे चित्र आहे़
अवैध धंदे वाढले, नागरिक त्रस्त
सिंदखेड राजा : शहरातील जिजामातानगर परिसरात वाढत्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
७२ प्रकरणांमध्ये घडवला समझाेता
बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये भराेसा सेलने समझाेता घडवला आहे़
जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळाला दिलासा
बुलडाणा : काेराेनामुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर बंद करण्यात आले हाेते. काेराेनाची लाट ओसरत असल्याने दिव्यांग तपासणी शिबिर ९ जूनपासून पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
वडगाव तेजन येथे हिवताप जनजागृती अभियान
सुलतानपूर : सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद वडगाव तेजन येथे हिवताप जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी डोअर टू डोअर फिरून डासांमार्फत होणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली़
वीज वितरण कंपनीची वसुली थांबवा!
साखरखेर्डा : वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोरोना काळात पठाणी वसुली सुरू केली आहे. ही वसुली थांबविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.