अवैध वाहतुकीमुळे अपघात वाढले
By admin | Published: November 17, 2014 12:52 AM2014-11-17T00:52:11+5:302014-11-17T00:52:11+5:30
लोणार तालुक्यातील बिबी परिसरात अवैध वाहतूक जोमात सुरू; वाहतूक शाखेचे होत आहे दुर्लक्ष.
चोरपांग्रा (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील बिबी परिसरात अवैध वाहतूक जोमात सुरू असून, त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष दिसून येत आहे. बिबी येथे विविध कामांसाठी जवळपास २0 खेड्यांचा संपर्क असतो. परिसरातील नागरिकांना दवाखान्यापासून आर्थिक व्यवहारापर्यंत प्रत्येक कामासाठी बिबीला यावे लागते. त्यामुळे परिसरात अवैध वाहतूक जोमात सुरू असते. शाळेतील मुलांकरिताही काही ठिकाणी बसची सुविधा नसल्याने त्यांना खासगी वाहतून प्रवास करावा लागतो; परंतु या खासगी वाहनात कोंबड्यागत प्रवासी कोंबल्या जात असून, विद्यार्थ्यांनाही याच वाहनातून ये-जा करावी लागते. परिसरात वाह तूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटनाही वाढत आहेत. बिबी पोलिसांनी दुसरबीड ते सुलतानपूरकडे जाणार्या मार्गावर वाहतूक नियंत्रण ठेवले, तर अवैध वाहतुकीला आळा बसू शकतो; मात्र याकडे वाहतूक शाखाच दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.