चार लाख ग्राहकांचे खाते ‘लिंक’ नाही
By admin | Published: November 14, 2014 11:23 PM2014-11-14T23:23:33+5:302014-11-14T23:23:33+5:30
गॅस सिलिंडरसाठी थेट अनुदान योजना : बुलडाणा जिल्ह्यात जानेवारीपासून प्रारंभ.
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
केंद्र शासनाने मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजने अंतर्गत गॅस सिलिंडरधारकांना थेट अनुदान बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ४७२.५0 रुपयाला मिळणार्या सिलिंडरसाठी आता ९७१ रुपये मोजावे लागणार आहेत. ही योजना उद्या, १५ नोव्हेंबरपासून राज्या तील काही निवडक जिल्ह्यात सुरू होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही योजना जानेवारी २0१४ पासून लागू करण्यात येणार आहे.
मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी योजने अंतर्गत गॅस अनुदान १00 टक्के बँक खात्यात जमा केल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात गॅसधारक ग्राहकांची संख्या ४ लाख ६५ हजार ६0४ एवढी आहे. यामध्ये आधार कार्डधारक व बँकेचे खात्याशी लिंक झालेल्या ग्राहकांची संख्या जेमतेम ४८ हजार १४९ एवढीच आहे. म्हणजे सुमारे ४ लाख १७ हजार ४५५ ग्राहकांनी अद्याप बँक खाते उघडून गॅस एजन्शीला लिंक केलेले नाही. त्यामुळे अशा गॅसधारक ग्राहकांना आपल्या बँक खात्याची नोंद संबंधित गॅ्रस वितरकाकडे करणे आवश्यक आहे. थेट खात्यात गॅस सिलिंडरची सबसिडी जमा करण्याची योजना मागील केंद्र शासनाने सुरू केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया पार पाडताना ग्राहकांना त्रास सहन करावा लागला; तसेच एवढी रक्कम एकदम भरणे सामान्यांना कठीण जात असल्याने भुदर्ंड सहन करावा लागत होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ओरड झाल्याने देशभरात ही योजना बंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपनेच या योजनेला विरोध दर्शविला होता. आ ता सत्तेत आल्यानंतर केंद्रातील याच भाजप सरकारने हीच योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता ग्राहकाला बँक खाते लिंक करावे लागणार आहे.