अठरा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:18 IST2021-03-25T10:18:43+5:302021-03-25T10:18:50+5:30
Accused absconding for 18 years arested गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शहर पोलिसांनी आरोपीस बाळापूर येथून ताब्यात घेतले.

अठरा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
खामगाव : तब्बल १८ वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार आरोपीस जेरबंद करण्यास शहर पोलिसांना बुधवारी सायंकाळी यश आले. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शहर पोलिसांनी आरोपीस बाळापूर येथून ताब्यात घेतले.
कोर्ट केस क्रमांक ६३/२००३ मधील आरोपी असलेला बाबाखाँ उर्फ सलामखाँ हा तब्बल १८ वर्षांपासून फरार होता. बºयाचदा शोध घेऊनही वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार होण्यात यशस्वी होत होता. मात्र सदर आरोपी बाळापूर येथे असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाळत ठेवून शहर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपीस बाळापूर येथून बुधवारी ताब्यात घेतले. या आरोपीस गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते. अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या आदेशान्वये शहर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाउपोनि रमजानपिरू चौधरी, पोनाकॉ दिनकर वानखडे यांनी ही कारवाई केली.