१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 06:48 PM2021-05-22T18:48:28+5:302021-05-22T18:49:58+5:30

Khamgaon News : मुख्य आरोपी राधुसिंग छत्तरसिंग डावर, रा. हनवतखेड याच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या.

Accused arrested in 17 deer deaths case | १७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक 

१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक 

Next
ठळक मुद्दे१४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहोचली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद (बुलडाणा) : तरोडा बु. गावाच्या शेत शिवारात दहा काळविटांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी राधुसिंग छत्तरसिंग डावर, रा. हनवतखेड याच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या. त्याला प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता २४ मेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
तालुक्यातील ग्राम तरोडा बु. शिवारामध्ये १४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोबतच आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहोचली होती. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करून हरणांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. शिवारात सहा मादी व चार नर प्रजातीच्या मृतदेहांचा दस्तऐवज तयार करून वनगुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी हरणांचे संपूर्ण अवयव आढळून आले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून त्यांच्या शरीराचे आवश्यक भाग गोळा करण्यात आले. नमुने सीलबंद करून न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासाकरिता पाठविण्यात आले. त्या दिवशीपासून आरोपीचा शोध सुरू होता.

तसेच जळगाव जामोदचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया व त्यांचे वनकर्मचारी तपास करीत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा छडा पाच दिवसांत लावण्यात आला. संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक (प्रा) बुलडाणा अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Accused arrested in 17 deer deaths case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.