महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस अटक
By admin | Published: July 19, 2014 12:23 AM2014-07-19T00:23:39+5:302014-07-20T02:03:03+5:30
मातोळा तालुक्यातील घटना
मोताळा : शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एका इसमाने विवाहित महिलेचा विनयभंग केला. धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या माळेगाव येथे आज १७ जुलै रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. तालुक्यातील माळेगाव येथील महिला आज सकाळी एकटी काम करीत होती. ती एकटी असल्याचे पाहून अजयसिंग सुरजसिंग राजपूत (वय २८) रा. माळेगाव याने तिचा विनयभंग केला व या दुष्कृत्याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. पीडित महिलेने या प्रकरणी धामणगाव बढे पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ५0६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. माधव पेठकर, पवन सपकाळ, शिवशंकर वायाळ करीत आहे.