वन्यप्राण्याची शिकार करताना आरोपीस अटक; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

By अनिल गवई | Published: August 22, 2023 01:46 PM2023-08-22T13:46:27+5:302023-08-22T13:47:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन्यजीव परीक्षेत्रामध्ये घोरपड जातीच्या वन्यजीवाची अवैध शिकार करणार्या एका आरोपीस अटक करण्यात ...

Accused arrested while hunting wild animals; Incidents at the Gnanaganga Sanctuary | वन्यप्राण्याची शिकार करताना आरोपीस अटक; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

वन्यप्राण्याची शिकार करताना आरोपीस अटक; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन्यजीव परीक्षेत्रामध्ये घोरपड जातीच्या वन्यजीवाची अवैध शिकार करणार्या एका आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात वनकायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर असे की, ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव खामगाव कार्यालयातंर्गत अभयारण्यातील अवैध चराईस आळा घालण्यासाठी पथक सक्रीय आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दल ाचे कर्मचारी तैनात आहेत. दरम्यान २१ ऑगस्ट रोजी रात्री गस्ती दरम्यान कवडगाव बीट मध्ये सुभाष भिका राठोड (५४) रा. वरवंड ता. िज. बुलढाणा याला घोरपड जातीच्या वन्यजीवाची शिकार करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या िवरोधात भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २६(१)ड व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, २९, ३१ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई विभागीय वनअधिकारी अ.वा. निमजे, सहा. वनसंरक्षक सी.एम.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.सी.लोखंडे यांच्या मार्गदर्शनात शीला खरात, एस. वाय. बोबडे, सानंदा नाईक, धम्मपाल खंडारे यांनी केली.

Web Title: Accused arrested while hunting wild animals; Incidents at the Gnanaganga Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.