भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्यास नागपुरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:27 PM2018-07-11T16:27:38+5:302018-07-11T16:31:19+5:30
खामगाव: येथील भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्या आरोपीस खामगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले.
खामगाव: शहर पोलिसांची कारवाई
खामगाव: येथील भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्या आरोपीस खामगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. खामगाव शहर पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीला नागपूर येथून अटक केली.
शुभम संतोष चांदुरकर (२३ )रा. वाडी असे आरोपीचे नाव असून, त्याने २३ फेब्रुवारी रोजी रात्री भाजपचे पदाधिकारी ओकारआप्पा तोडकर यांची महागडी कार पेटविली होती. या घटनेत तोडकर यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात गेल्या तीन महिन्यांपासून चालविला होता. आरोपी डिटेक्टही झाला होता. मात्र, वारंवार तो घटनास्थळ बदलवित होता. गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून शहर पोलिसांनी त्याला मंगळवारी नागपूर येथून ताब्यात घेतले. खामगाव शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय रविंद्र लांडे यांंच्या पथकाने शुभम चांदुरकरला खामगावात आणले. ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. शहरात कबड्डीचा वाद उफाळून आल्यानंतर ओंकारआप्पा तोडकर यांची कार पेटविण्यात आली होती. हे येथे उल्लेखनिय!