हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल

By अनिल गवई | Published: May 18, 2023 05:07 PM2023-05-18T17:07:18+5:302023-05-18T17:07:41+5:30

खामगाव येथील न्यायालयाचा निकाल: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी अडकला 

Accused sentenced to life imprisonment for murder; Judgment of Khamgaon Court | हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल

हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल

googlenewsNext

अनिल गवई

खामगाव: शेगाव येथील जगदंबा चौकातील टी सेंटर मधील हत्या प्रकरणातील आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने १३ साक्षीदार तपासले. यात सीसी फुटेजचा पुरावा महत्त्वाचा ठरला.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शेगाव येथील जगदंबा चौकातील माउली टी सेंटरमध्ये आठवडी बाजारातील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम या २२ हा युवक ६ मे २०१८ रोजी बसला होता. दरम्यान सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी घटनास्थळी आला. युवकाशी वाद घालून मोबाईल हिसकावून घेत, खिशातील चाकूने मो. शोएबच्या मानेवर, पोटावर, व गालावर १९ घाव घातले. शोएब रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी मोहम्मद दानिश जाहीद हुसेन याच्यासह दोघांविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१, १२० बी, ३४० नुसार गुन्हा दाखल केला. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान, घटनेच्या दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये पूर्व वैमनश्यातून वाद झाला होता. हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. त्यानंतर पुन्हा वाद उफाळून आल्याने ही घटना घडल्याचे पोलीसांनी न्यायालयात नमूद केले.

या न्यायप्रविष्ठ प्रकरणात खामगाव न्यायालयाने १३ साक्षीदार तपासले. सबळ पुराव्याच्या आधारे खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एस कुलकर्णी यांनी गुरूवारी आरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावाचे शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकार पक्षाची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. रजनी बावस्कर भालेराव यांनी मांडली.

Web Title: Accused sentenced to life imprisonment for murder; Judgment of Khamgaon Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.