मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षांची शिक्षा
By admin | Published: November 19, 2016 12:27 AM2016-11-19T00:27:59+5:302016-11-19T00:27:59+5:30
क्षुल्लक कारणावरुन झाली होती मारहाण.
खामगाव, दि. १८- क्षुल्लक कारणावरुन मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना तालुक्यातील चिखली खु. येथील असून, खामगाव न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला आहे.
तालुक्यातील चिखली येथील विजय रामभाऊ मानकर व विजय प्रल्हाद लाहुडकर यांच्यात क्षुल्ल्क कारणावरुन वाद होता. २९ जुलै २00७ रोजी प्रल्हाद लाहुडकर याने वैमनस्यातून विजय मानकर रुम्हणे व खुटाने मारहाण केली.गंभीर जखमी असलेल्या रामभाऊ मानकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जलंब पोलिसांनी श्रीकृष्ण लाहुडकर, विजय लाहुडकर व प्रल्हाद लाहुडकर विरुध्द कलम ३0२, ३0७, ३२७, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला व सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची शुक्रवारी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी आरोपीास सात वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावली.