अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:31+5:302021-07-10T04:24:31+5:30
या प्रकरणात प्रथमत: लग्नाचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी नंदकिशोर लोडू ...
या प्रकरणात प्रथमत: लग्नाचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी नंदकिशोर लोडू हरमकार यास पोलिसांनी अटक केली होती. मे महिन्यातील ही घटना होती. प्रकरणाच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलीने बुलडाणा येथील बाल न्याय मंडळासमोर तिच्याच गावातील एका व्यक्तीनेही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे म्हंटले होते. त्यास पीडितेची आईही सहकार्य करत होती, असा जबाब दिला होता. त्यावरून पोलिसांनी पीडितेच्या आईसह संबंधित गावातील व्यक्तीसही प्रकरणात दोन दिवसापूर्वी अटक केली होती. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पीडित मुलीच्या आईसह गावातीलच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस मेहकर येथील न्यायालयासमोर ९ जुलै रोजी हजर केले असता, न्यायालयाने या दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.