परिश्रमाची पराकाष्ठा केल्यास यश निश्‍चित!

By admin | Published: October 24, 2016 02:36 AM2016-10-24T02:36:46+5:302016-10-24T02:36:46+5:30

हॅण्डबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांचे प्रतिपादन.

Achieving success if you succeed! | परिश्रमाची पराकाष्ठा केल्यास यश निश्‍चित!

परिश्रमाची पराकाष्ठा केल्यास यश निश्‍चित!

Next

बुलडाणा, दि. २३- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या विद्यमाने २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पर्धा १४, १७, १९ वर्षाआतील मुले/मुलींसाठी आयोजन करण्यात आलेले आहे.
चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरच्या विस्तिर्ण मैदानात रविवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय झाडे, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक, प्रतिभा देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा परिषद अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, नेमाने, निवासी उ पजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, बुलडाणा अर्बन को.ऑप. क्रे. सोसायटीचे मुख्य कार्यकारी संचालक, डॉ. सुकेश झंवर, शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारार्थी टी.ए. सोर, बुलडाणा जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे अध्यक्ष दीपक जाधव, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
खेळाडूंनी निवड केलेल्या खेळाचा नियमित सराव करावा. परिश्रमाची पराकाष्ठा करून खेळात यश संपादन करावे असे प्रतिपादन अमरावती विभागीय आयुक्त, जे.पी. गुप्ता यांनी केले. तर जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी उपस्थित हॅण्डबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, उन्हाचे चटके मिळाले तरच सावलीचा आनंद मिळेल. त्यामुळे त्याप्रमाणे खेळ खेळण्याचे सार्मथ ठेवण्यास निश्‍चितच खेळाचा आनंद घेता येईल. खेळ खेळण्याचे सार्मथ ठेवा.
सर्वप्रथम मोमेन्टो व स्वामी विवेकानंद यांचा विचारग्रंथ देऊन सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मशालद्वारे ज्योत पेटविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक, प्रतिभा देशमुख यांनी केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यस्तर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग आहे. त्यांची निवास, भोजन, मैदान व्यवस्थेबाबत सविस्तर सांगितले व खेळाडूंना भरभरून शुभेच्छा दिल्या. मशाल प्रज्वलित करून व फटाक्यांच्या आतषबाजीत मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पधेर्चे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात आले. 

Web Title: Achieving success if you succeed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.