बुलडाणा जिल्ह्यातील २८ खाजगी डॉक्टरांची सेवा अधीग्रहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:36 AM2020-10-13T11:36:14+5:302020-10-13T11:36:41+5:30
सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या डॉक्टरांना दिनांक व वार नेमून देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिह्यातील कोविड 19 रूग्णांची संख्या पाहता शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २८ खाजगी डॉक्टरांची सेवा ऑक्टोंबर महिन्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या डॉक्टरांना दिनांक व वार नेमून देण्यात आला आहे.
कोविड १९ या आजाराकरीता सेवा अधिग्रहीत केलेल्या डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून न दिल्यास त्यांचे विरूद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कारवाई करण्यात येईल.
तसेच त्यांची नोंदणी रद्द करण्याकरीता इंडियन मेडीकल कॉन्सील व आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. राममूर्ती यांनी कळविले आहे.