नवनवीन ज्ञान आत्मसात करणे, तणावमुक्त जीवनाचे गमक : गर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:48+5:302021-05-31T04:25:48+5:30
स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अनुराधा परिवारातील प्रत्येक सदस्य तणावमुक्त ...
स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अनुराधा परिवारातील प्रत्येक सदस्य तणावमुक्त राहून आनंदी जीवन जगला पाहिजे. या अनुषंगाने प. रा. मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात डॉ. गर्ग यांचे तणावमुक्तीसंदर्भाने ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गर्ग यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करून ताणतणावातून कसे बाहेर पडावे व आनंदी जीवन जगण्यासंदर्भाने विस्तृत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, डॉ. काळे, डॉ. पागोरे, प्रा. सुनील वळसे, जया नन्हई, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र कोकाटे यांनी आभार मानले.