मेहकर तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:28+5:302021-04-07T04:35:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर ...

Acquisition of 10 wells in Mehkar taluka | मेहकर तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण

मेहकर तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर लघू जलाशय तुडुंब भरले होते. मात्र तरीही मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट कायम असून पाणीटंचाईकरिता आजपर्यंत १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी व कोराडी प्रकल्पासह इतर सर्व लघुजलाशय तुडुंब भरले आहेत. यामुळे पाण्याची पातळी भरपूर प्रमाणात राखली गेली होती. मात्र तरीही मेहकर तालुका वर काही गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट अजूनही कायम आहे. ही पाणीटंचाई दूर करण्याकरता टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येणार आहे. तर सद्य परिस्थितीमध्ये १० गावाकरता १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पुढील महिन्यात गरज पडल्यास आणखीन विहिरीचे अधिग्रहण करण्यात येऊन ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

बॉक्सः मोहना खुर्द, नायगाव देशमुख, गणणूर, खानापूर, सुकळी, परतापूर, सोनाटी, पांगरखेड, उसरण आणि सुळा या गावांकरता विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

कोटः टंचाईग्रस्त गावांचे प्राप्त प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्यात येऊन तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. - आशिष पवार, गटविकास अधिकारी, मेहकर

Web Title: Acquisition of 10 wells in Mehkar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.