चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:35+5:302021-05-25T04:38:35+5:30

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ...

Acquisition of 28 villages in Chikhali taluka! | चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

Next

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ते आतापर्यंत २८ गावांच्या पणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा आहे़ त्यामुळे तालुक्याला गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे. असे असले तरी तालुक्यातील २८ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने २६ गावांसाठी विहिरींचे तर २ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होण्याची शक्यता असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी चार गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, डासाळा, साकेगाव, तोरणवाडा, खोर खैरव, भोगावती सैलानी नगर, असोला बु., कोलारा, अमोना, भरोसा, रानअंत्री, टाकरखेड मु., वैरागड, भालगाव, पिंपरखेड, भानखेड, मेरा खुर्द, माळशेंबा, अंत्री खेडेकर या गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरीं व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना टँकरचा आधार

तालुक्यातील असोला बु., भोगावती-सैलानी नगर, असोला खु, कोलारा या चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यानुषंगाने खासगी विहिरींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

हातणीचा पाणीपुरवठा विस्कळीत !

सद्यस्थितीत हातणी ते धाड या 'नॅशनल हायवे ७५३ एम' या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे हातणी या गावच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन गेल्या पाच महिन्यांपूर्वी फुटली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्याप पाईपलाईनची दुरूस्ती करून दिलेली नाही. तथापि याबाबत जाब विचारणारे राम जाधव यांच्यावरच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रकार घडला आहे. परिणामी या गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याची दखल घेत जाधव यांनी स्वखर्चातून एक विहिरीवरून पाईपलाईन टाकून गावास पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.

Web Title: Acquisition of 28 villages in Chikhali taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.