मेहकर तालुक्यातील ३३ विहीरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:41+5:302021-05-20T04:37:41+5:30
मात्र काही गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई असून, अशा ३३ गावांतील ३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबतच तीन गावांसाठी टँकरचे ...
मात्र काही गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई असून, अशा ३३ गावांतील ३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबतच तीन गावांसाठी टँकरचे प्रस्ताव असून, संबंधित गावांत येत्या काही दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी व कोराडी प्रकल्पासह इतर सर्व लघु जलाशय तुडुंब भरले आहेत. यामुळे पाण्याची तालुक्यात उपलब्धता आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक १६ टक्के सिंचन हे एकट्या मेहकर तालुक्यात होते. दरम्यान, येत्या काळात गरज पडल्यास काही गावांतील विहिरी अधिग्रहित करण्याची तयारी टंचाई विभागाने सुरू केली आहे. मोहना खुर्द, नायगाव देशमुख, गणपूर, खानापूर, सुकळी, परतापूर, सोनाटी, पांगरखेड, उसरण, सुळा, जयताळा, शेंदला, उकळी, खुदनापूर, शहापूर, आंध्रुड, नांद्रा, चायगाव, जनुना, मोळा, बोरी, मांडवा समेत उटी, दादुलगव्हाण, विश्वी, पारडी, कल्याणा, मोहदरी, बरटाळा, साब्रा, मोसंबेवाडी, लोणी काळे, बारडा आणी निंबा या गावांतील विहिरी अधीग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबतच हिवरखेड आणि लावणा या दोन गावांतील विहिरींचेही अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेले आहेत.
--तीन गावांसाठी टँकर--
मेहकर तालुक्यातील वडाळी, रत्नापूर व पारडी या तीन गावांसाठी टँकरने येत्या काळात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. सोबतच टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता देऊन तेथे टंचाई जाणवणार नाही, यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे संवर्ग विकास अधिकारी आशिष पवार यांनी यांनी स्पष्ट केले आहे.