अभिनय स्पर्धेत जि.प.हायस्कूल पान्हेरा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:22 PM2017-10-02T13:22:30+5:302017-10-02T13:22:30+5:30
बुलडाणा : महाराष्टÑ विद्या प्राधिकरण पुणे व जि.शै.सा.व्यावसायिक विकास संस्था बुलडाणा व्दारा आयोजित भुमिका अभिनय स्पर्धेत जि.प. हायस्कूल पान्हेरा खेडीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक ए.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक जितेंद्रसिंह मोरे, लिखीत व दिग्दर्शीत लघुनाटीका ‘एकच मिशन-डॉक्टर किशन’ सादर करण्यात आली. यात पालकांच्या अतिरेकी अपेक्षा शिकणाºया मुलांसाठी कशाप्रकारे जिवघेण्या ठरतात याचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले. यावेळी विजयी स्पर्धक अस्मिता जाधव, सपना खोरगडे, सुमित निमकर्डे, सचिन चौधरी, संदेश जाधव, शिक्षक जितेंद्र मोरे यांचे एक हजार रूपये रोख व प्रमाणपत्र प्राचार्य शिवशंकर मोरे यांचेहस्ते देऊन अमरावती येथे होणाºया विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्या उज्वलाताई मोरे, सरपंच सुनिल वैराळकर, अनिल काकर, राजेंद्र तायडे, दिनकर जाधव, उध्दव मुळे, लक्ष्मण फदाट, गजानन पवार, स्मिता सावळे, प्रल्हाद माठे, तांबेकर, संदिप मोरे, विजय राहाणे, संदिप इंगळे, प्रकाश पाटील, रामेश्वर शिंदे, स्वाती किन्होळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.