५0 वाहनांवर कारवाई

By admin | Published: September 3, 2014 10:55 PM2014-09-03T22:55:05+5:302014-09-03T22:56:57+5:30

गणेश उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सिंदखेडराजा पोलिसांची धडक मोहीम.

Action on 50 vehicles | ५0 वाहनांवर कारवाई

५0 वाहनांवर कारवाई

Next

सिंदखेडराजा : उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सध्या बिघडलेल्या वाहतुक व्यवस्थेला ताळ्यावर आनण्यासाठी पोलिस विभागाने मोहिम हाती घेतली आहे. सिंदखेडराजा पोलिस स्टेशनच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी जवळपास ५0 वाहनांवर धडक कारवाई करुन ५ हजार ७00 रुपये दंड वसूल केला.
सिंदखेडराजा शहरातून मुंबई नागपूर महामार्ग जातो. या महामार्गावर रोडच्या कडेला मोटारसायकल व चारचाकी वाहने लावून वाहनधारक आपली कामे करण्यासाठी फिरतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाचा रस्त्याने जाणार्‍या वाहनांना नेहमीच अडथळा होतो. अशा बेफीकीर वाहनधारकांना धडा शिवकवण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. जवळपास ५0 वाहने पकडून ५ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी वसुल केला. दरम्यान ज्या वाहनाचे मालक वाहनाजवळ हजर नाहीत अशी वाहने पोलिसांनी उचलून ट्रॅक्टरमध्ये भरली व ही वाहने सरळ पोलिस स्टेशनला जमा केली. पोलिसांनी अचानक घेतलेल्या या भुमिकेमुळे वाहनधारकांना चांगला आर्थिक भुर्दंड बसला. ही मोहिम अशीच अधून मधून राबवावी अशी अपेक्षा आहे. या मोहिमेत ठाणेदार बी.डी.मसराम, पीएसआय चित्तडवाड यांच्यासह ४0 पोलिस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

*तगडा पोलिस बंदोबस्त
सिंदखेडराजा शहरात जवळपास १६ सार्वजनिक गणेश मंडळ असून महामार्ग हाच मिरवणुकीचा मार्ग आहे. गणेशोत्सवासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, यामध्ये २0 होमगार्ड, ५ स्त्री व ५ पुरुष प्रशिक्षणाधारी पोलिस, २ अधिकारी व १0 पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी ३ पायी पेट्रोलिंग फिरते पथक असून, एका पथकात ५ पोलिस कर्मचारी समाविष्ट आहेत.

गणेशोत्सवादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ६ सप्टेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी ६ पोलिसांचे १ मोबाईल पेट्रोलिंग पथक व २ दुचाकी पेट्रोलिंग पथक कार्यान्वीत करण्यात आले आहेत.
-बी.डी.मसराम
ठाणेदार, सिंदखेडराजा.

Web Title: Action on 50 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.