चार हजार वाहनधारकांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 12:04 PM2021-06-09T12:04:39+5:302021-06-09T12:04:45+5:30

Khamgaon News : खामगाव शहर पोलिसांनी ०७ मार्च ते ३१ मे या कालावधीत तब्बल ४००० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला.

Action against 4,000 vehicle owners! | चार हजार वाहनधारकांवर कारवाई!

चार हजार वाहनधारकांवर कारवाई!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  कडक निर्बंध कालावधीत सतर्कता आणि कारवाईत तत्परता दाखवित, खामगाव शहर पोलिसांनी ०७ मार्च ते ३१ मे या कालावधीत तब्बल ४००० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. त्याच वेळी  पालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या कारवाईच्या माध्यमातून २ लक्ष ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. 
१५ फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढीस लागला होता. शहरासह ग्रामीण भागात महिन्याभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, काही प्रमाणात दिलासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कडक निर्बंध कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना शहर पोलिसांनी चांगलेच वठणीवर आणले. पालिका पथकाच्या मदतीने साधारणपणे दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ लक्ष रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात  ४,००० हजार मोटार वाहन कायद्याच्या सर्वाधिक कारवाया खामगाव शहर पोलिसांनी केल्या आहेत. यामध्ये ट्रिपल सीट प्रवास, लायसन्स न बाळगणे, सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास न करणे, यासह विविध प्रकारचा दंड ठोठावला आहे.


२६३ गुन्हे दाखल
 कडक निर्बंध कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर व्यावसायिक दुकाने उघडणाऱ्या २६३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सलून, कापड, झेरॉक्स, वाहने आणि इतर प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. 
 या सर्व दुकानदारांविरोधात भादंवि कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१(ब), तसेच  साथ रोग अधिनियम ०३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.


कडक संचारबंदी काळातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच लक्ष्य केंद्रित केले. या कालावधीत मोटार वाहन कायद्यानुसार ४,००० कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे.
- सुनील अंबुलकर
शहर पोलीस निरिक्षक, 
खामगाव.

Web Title: Action against 4,000 vehicle owners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.