बेकायदा दुकाने लावणाऱ्या सात दुकानदारांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 08:56 PM2020-04-15T20:56:36+5:302020-04-15T20:59:39+5:30
बेकायदा दुकाने लावणाऱ्या सात दुकानदारांविरुद्ध कारवाई
संग्रामपूर: लॉकडाउनच्याकाळात तालुक्यातील ग्राम आवार येथे १३ एप्रिलरोजी अनाधिकृत बाजार काही व्यक्तींकडून भरविण्यात आला होता. याप्रकरणी सात दुकानदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवार येथे १३ एप्रिलरोजी बाजार भरविण्यात आला होता. गटविकास अधिकारी यांनी आवार येथील सरपंच व सचिवांना यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर आवार सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी स्पष्टीकरण देत अनधिकृत दुकाने लावणाºयांवर कार्यवाही करण्याचे पत्र तामगाव पोलीस स्टेशनला दिले होते. त्यावरून सात जणांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी दोन दिवस अगोदर एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्या व्हिडीओ क्लिप मध्ये बाजार भरून गर्दी असल्याचे दिसून आले होते.
विशेष म्हणजे या गावात कधीच बाजार भरला नाही. अचानक बाजार भरून प्रशासनाच्या हेव्या दाव्यांची हवा काढली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी संग्रामपूर गटविकास अधिकारी याना दूरध्वनीवरून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. गटविकास अधिकारी यांनी ग्राम पंचायतीला पत्र देऊन २४ तासात स्पष्टीकरण मागीतले होते. त्यावर ग्रामपंचायतीने तामगाव पोलीस स्टेशनला बेकायदा दुकानदारावर कार्यवाही करण्यासंदर्भात फिर्याद दिली होती. गटविकास अधिकारी यांनी ग्राप ला पत्र देऊन ज्या लोकांनी दुकाने लावली त्यांचे विरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याबाबत सूचित केले होते. त्यावर आवार सरपंच रंजना अवचार, पोलीस पाटील अवचार आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीनिशी १४ एप्रिल ला तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पातूर्डा येथील सुभाष रोठे, अंबादास इंगळे, सुभाष सरावणे, आवार येथील प्रमोद बोदडे, आसिफ समद खा, निलेश अवचार, गोपाल अवचार अश्या सात दुकानदारा विरुद्ध तामगाव पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आवार ग्रामपंचायतीकडून प्राप्त फियार्दीवरून बेकायदेशीररित्या गावात दुकाने लावणाºया सात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. - भुषण गावंडे ठाणेदार पोलीस स्टेशन तामगाव