देऊळगाव राजात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:38 AM2021-02-20T05:38:59+5:302021-02-20T05:38:59+5:30
देऊळगाव राजा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. मास्क न लावता ...
देऊळगाव राजा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. मास्क न लावता फिरणाऱ्यांवर तसेच काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. देऊळगाव राजा तहसीलदार सारिका भगत, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा सुनीता रामदास शिंदे, वैद्यकीय अधीक्षक आसमा शाहीन यांनी प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. गत दोन दिवसांपासून शहरांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर संयुक्तिक कारवाई केली जात आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्यावागाने वाढत आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व या केंद्रावर उपस्थित असलेले कर्मचारी, डॉक्टर यांना आवश्यक त्या सूचना देऊन आता नव्याने जो करुणा संसर्ग वाढलेला आहे, त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना तथा मार्गदर्शन केले. देऊळगाव राजा तहसीलदार सारिका भगत यांनी तालुक्यातील सर्व विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन नियमांचे पालन करून आवश्यक उपाययोजनासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी संबंधित आरोग्य विभागाला शहरांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच नागरिकांनी मास्क वापरून योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांमध्ये शंभराहून अधिक मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे तसेच ठाणेदार संभाजी पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना चौका-चौकांमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.