मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:32+5:302021-07-19T04:22:32+5:30
मधुमक्षिका पालनाचा लाभ घ्या बुलडाणा: शेतकऱ्यांना शेतीपिके, फळपिके यामध्ये १५ ते ४० टक्केपर्यंत परागीभवन होऊन वाढ होऊन मधमाशा पालन ...
मधुमक्षिका पालनाचा लाभ घ्या
बुलडाणा: शेतकऱ्यांना शेतीपिके, फळपिके यामध्ये १५ ते ४० टक्केपर्यंत परागीभवन होऊन वाढ होऊन मधमाशा पालन हा शेतीपूरक जोडधंदा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी व लाभार्थी यांनी मधुमक्षिका पालन या व्यवसायाकडे वळून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर यांनी केले आहे.
कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज
बुलडाणा : कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज असून त्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी प्रत्येक आठवड्यात होणे आवश्यक आहे. शेतावर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत कामे होत असतात.
रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष
बुलडाणा: रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे सध्या दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्या दरवर्षी निर्माण होतात. त्यासाठी भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद, छतावरील पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) अधिक प्रमाणात करण्यात यावे, असे आवाहन भूजल विभागाकडून करण्यात येते.
आरटीईसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ
बुलडाणा: आरटीई प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. जूनमध्ये शाळा प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यांतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुुदत होती. आता २३ जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.