साखरखेर्डात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:49+5:302021-05-12T04:35:49+5:30
साखरखेर्डा हे शहरवजा गाव असले तरी या गावाची लोकसंख्या २० हजार आहे . परिसरात २५ ते ३० गावांचा व्यापारीदृष्टीने ...
साखरखेर्डा हे शहरवजा गाव असले तरी या गावाची लोकसंख्या २० हजार आहे . परिसरात २५ ते ३० गावांचा व्यापारीदृष्टीने रोजचा संबंध येतो. आठवडी बाजारात दररोजची भाजी विक्रेत्यापासून खरेदीदारांची गर्दी नित्याची झाली होती. भारतीय स्टेट बँकेच्या परिसरात, प्राथमिक आरोग्य केंद्रात, किराणा दुकानात दररोज गर्दी वाढत असल्याने कोरोना साखळी तुटण्याऐवजी वाढतच गेली़ आज अमुकाचे कोरोनाने निधन झाले. तो तर काल चांगला होता, आज दवाखान्यात नेला तर... अशा वार्ता रोजच्या झाल्या. कोरोना संक्रमण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ साखरखेर्डा पोलिसांनी गावात आणि बसस्थानकावर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रसाद दिला आणि पुन्हा फिरकला तर कशी कारवाई करायची, असा समजही ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिला. त्यामूळे साखरखेर्ड्यात वाहन चालकांनी घराकडे धूम ठाेकली. १० दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून याची सर्वच नागरिकांनी दखल घेऊन नियमाचे पालन करावे, असे आवाहन जितेंद्र आडोळे यांनी केले़