मेहकरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:33 AM2021-03-25T04:33:13+5:302021-03-25T04:33:13+5:30
मेहकरः तालुक्यात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे.यामुळे प्रशासनाने कडक नियमांची अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी तहसिल आवारात ...
मेहकरः तालुक्यात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे.यामुळे प्रशासनाने कडक नियमांची अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी तहसिल आवारात विना मास्क फिरणाऱ्या व बेशिस्त वाहन लावणाऱ्या वाहनधारकांवर कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार आणि नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही माेहिम राबवली.
मेहकर शहरासह तालुक्यात दररोज कोरोना विषाणूचे रुग्ण संख्या वाढत आहे.यामुळे कोरोणाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मात्र अजूनही नागरिक बेफीकिर होऊन नियमाचे उल्लंघन करीत आहेत.यामुळे तहसिल कार्यालयाच्या आवारात तहसिलदार डाँ.संजय गरकल ,मुख्याधिकारी सचिन गाडे,गायकवाड ,तहसिल व नप ची चमू यांनी दंडात्मक कार्यवाही केली.यामध्ये विना मास्क ,चुकीच्या पध्दतीने वाहन लावणे असे एकुण दहा जणावर कार्यवाही केली.
दुय्यम निंबधक कार्यालयाचा ढिसाळपणा
प्रशासन कोरोणा संक्रमण तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.मात्र येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नागरीक नियमाचे उल्लंघन करुन प्रवेश करीत होते.या बाबीला दुय्यम निबंधक व त्यांचे कर्मचारी यांना जबाबदार धरीत तहसिलदार यांनी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दंड आकारला.